जळगाव ( प्रतिनिधी ) – एकेकाळी ही बँक ‘ ड ‘ वर्गात जाते की काय ? , अशी भीती निर्माण झाली होती . मात्र आता जळगाव जिल्हा बँकेकडे ९६६ कोटींच्या ठेवी आहेत सर्वच पातळ्यांवर ६ वर्षात सुधारणांचे धोरण निक्षून राबवले म्हणून ही बँक आता सशक्त झाली आहे , अशी माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली . जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीतील प्रचाराचा भाग म्हणून आज महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचा जळगाव तालुक्यातील मतदार सभासदांचा मेळावा महापौर जयश्री महाजन यांनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित केला होता या मेळाव्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे बोलत होते .
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या या मेळाव्यातील भाषणाची सर्वांनाच उत्सुकता होती . अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना नेमक्या भाषेत प्रत्युत्तर दिले ते पुढे म्हणाले की , राज्यात अनेक जिल्हा बँका अवसायनात गेल्या हे वास्तव आहे एकेकाळी ही बँक ‘ ड ‘ वर्गात जाते की काय ? , अशी भीती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना पुरेसा वित्तपुरवठा होऊ शकला नव्हता आम्ही सहा वर्षांपूर्वी नवे संचालक मंडळ आल्यावर सर्वच पातळ्यांवर ६ वर्षात सुधारणांचे धोरण निक्षून राबवले म्हणून ही बँक आता सशक्त झाली आहे . जिल्ह्यात आजही अनेक सहकारी संस्था त्रासात आहेत बेलगंगा , चोपड्याचा साखर कारखाना ,मुक्ताईनगर वगळता अन्य सूतगिरण्या बंद आहेत . जिल्ह्यातील या सहकारी संस्थांकडे जिल्हा बँकेचे ११० कोटी रुपये अडकलेले आहेत. आम्ही संचालकांचे दौरे बंद केले , गाड्या बंद केल्या , बैठकांमध्ये फक्त चहा दिला , संचालक त्यांच्या गाड्यांनी येतात , घरून सोबत जेवण आणतात . या धोरणातून बँक सावरली गेली . ६ वर्षात ९६६ कोटींवर ठेवी गेल्या , हे या बँकेत गेल्या १०० वर्षात झाले नव्हते . पूर्वी जिल्हा बँक नाबार्ड आणि राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना कर्ज वाटप करीत होती. आता ही बँक स्वतःच्या भांडवलाच्या जोरावर शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते आहे . सुरक्षित कर्जवाटपाची काळजी घेतली गेली आहे . जिल्हा बँक आता नाबार्ड आणि राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेत नाही . आम्ही सगळी बँकेची खरेदी इ टेंडरने केली. बँक रिक्रुटमेंट बोर्डाकडून ऑनलाईन परीक्षा घेऊन २७५ कर्मचाऱ्यांची भरती केली . काही संस्थांना पुरेसे तारण घेऊन कर्ज दिले . एन पी ए कमी केला . आता वार्षिक ४ कोटी रुपये उत्पन्न जिल्हा बँकेला व्याजातून मिळते आहे . .त्यामुळे माझे विरोधकांना आव्हान आहे की त्यांनी काय करायच्या त्या चौकशा कराव्या , आम्ही स्वच्छ आहोत , १ रुपयाचा जरी गैरव्यवहार सापडला तरी मी राजकारणातून निवृत्त होईन . मला शेतकऱ्यांच्या वेदना समजतात . त्यामूळे यापुढेही कुणालाही आक्षेपार्ह काम करू देणार नाही . भ्रष्टाचारी असतो तर आमचेपण कारखाने उभे राहिले असते . विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांची परिस्थिती वाईट आहे या संस्था जगल्या पाहिजेत . त्यासाठी जाणीवपूर्वक काय प्रयत्न करता येतील याचा विचार करतोय , असेही ते म्हणाले .