जळगाव (प्रतिनिधी) : जळगाववसह रावेर लोकसभेसाठी सोमवार दि. १३ रोजी मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी आहे तर काही मतदान केंद्रावर मात्र संथगतीने मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार दुपारी ३ पर्यंत जळगाव लोकसभेसाठी ४२. १५ तर रावेरसाठी ४५. २६ टक्के मतदान झाले.
जळगाव शहरात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, गोदावरी पाटील यांच्यासह उमेदवारांनी त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडली.
जळगाव लोकसभा निवडणूक – विधानसभानिहाय मतदान
जळगाव शहर – ३९.२३ %
जळगाव ग्रामीण – ४५.०२ %
अमळनेर – ४१.१६ %
पारोळा-एरंडोल – ४६.०४ %
भडगाव-पाचोरा – ४३.८० %
चाळीसगाव – ३९.०७ %
रावेर लोकसभा निवडणूक – विधानसभानिहाय मतदान
चोपडा- ४६.१६ %
रावेर – ४८.७१ %
मुक्ताईनगर – ४३.१० %
भुसावळ – ४३.६१ %
जामनेर – ४१.७० %
मलकापूर – ४८.६७ %