जळगाव (प्रतिनिधी ) – शहरात अजिंठा शासकीय विश्रामगृहात तरुणीवर अत्याचार झाल्याची चर्चा सुरु असताना आता शासकीय विश्रामगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे
या सनसनाटी चर्चेनंतर आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व भाजपच्या आमदारांनी चौकशीची मागणी करण्यात आल्याने पोलीसांकडूनही तपास केला जात आहे. या विश्रामगृहात सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याचे समोर आले आहे.
कोणीही तक्रारदार समोर आलेली नसल्याने किंवा सबळ पुरावे पोलीसांना मिळालेले नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीला किंवा प्रशासनाला शासकीय विश्रामगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महत्त्वाचे वाटले नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शासकीय विश्रामगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे सांगितले. अत्याचाराच्या या कथित घटनेच्या पार्शवभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे हाच पहिला पुरावा ठरला असता