जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील रेल्वे स्थानकावर ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह ठेवण्यात आला असून पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ५ वर एका ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी पंचनामा केला खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला तरूणाचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. अंगावर निळ्या फिक्कट रंगाची जिन्स पॅन्ट, दाढी मिशी वाढलेली असे मयत तरूणाचे वर्णन आहे. ओळख पटल्यास जळगाव रेल्वे पोलीसांशी संपर्क करावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे यांनी केले आहे.