उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार; दिग्गज मान्यवरांची लाभणार उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने आयोजित सर्व शाखिय सोनार समाजाचा ‘ऋणानुबंध’ वधु-वर व पालक परिचय मेळावा उद्या रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जळगाव, आदित्य लॉन, लोकमत प्रेस जवळ,एम आय डी सी, संभाजी नगर रोड, जळगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, समाजातील उपवर मुला-मुलींच्या विवाहाचे प्रश्न सुटावेत व एकाच व्यासपीठावर परिचय व्हावा, या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), आमदार सौ. चित्राताई किशोर वाघ, व्यवसायिक सुनील मंत्री, माजी आमदार जयप्रकाशजी बावीस्कर, तसेच जळगाव मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. रंजनाताई विजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान यासोबतच समाजातील मान्यवर गौरव बिरारी, यश विसपुते, धनजी बाबा,चंद्रकांत सोनार, संजय जाधव, अनिल वानखेडे, रमेश वाघ, संजय विसपुते, शरदचंद्र रणधीर आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान परराज्यातूनही येणार समाज बांधव केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर शेजारील मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातूनही मोठ्या संख्येने समाज बांधव आपल्या पाल्यांसह या मेळाव्यासाठी जळगावात दाखल होणार आहेत. विविध शाखिय सोनार समाजाचे हे एक मोठे संमेलन ठरणार असून, यात पालकांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि योग्य स्थळ निवडण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
“समाजातील जास्तीत जास्त बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मेळाव्यास उपस्थित राहावे,” असे आवाहन मेळावा सचिव प्रशांत विसपुते यांनी केले आहे.








