जळगाव रेल्वे स्थानकाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने परप्रांतीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेश कटारिया (वय ४२ रा. पिंप्री, जि., देवास, मध्यप्रदेश) असे मयत परप्रांतीय व्यक्तीचे नाव आहे. जळगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का राजेश कटारिया याला लागला. ही घटना शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात राजेश हा गंभीर जखमी झाल्याने रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी तातडीने धाव घेवून त्याला जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. दरम्यान मयताची ओळख पटल्यानंतर त्यांचे नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर सकाळी ११ वाजता शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.









