जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नागेश्वर कॉलनीतील वृद्ध महिलेचे बंद घर फोडून घरातून ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवार दि. ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलकिशोर गौरीशंकर पांडे (वय-६४) हे परिवारासह नागेश्वर कॉलनीत वास्तव्याला आहे. दिनांक ६ जून रोजी सकाळी ११ वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. घर बंद असल्याचा फायदा घेत असल्याने अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याची दागिने आणि रोकड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. घटना शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आली आहे. त्यानंतर फिर्यादी कमलकिशोर यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.