आकाशवाणी चौकात उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यावेळी लावले होते होर्डिंग !
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आकाशवाणी चौकात दि. १७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भलेमोठे होर्डिंग धोकादायक स्थितीत लावले होते. याची दाखल घेऊन महानगरपालिकेने कार्यकर्त्यांना दंड ठोठावला असून तो वसूलही केला आहे. तर ‘नही’ला देखील पत्र पाठविले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासाठी शहरात अनेक ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून फलक लावण्यात आले होते. तर आकाशवाणी चौकात काही कार्यकर्त्यांनी भलेमोठे होर्डिंग लावून वाहनधारकांना धोका निर्माण होईल अशी स्थिती झाली होती.(केजीएन)मनपाचे नियम धाब्यावर बसवत लावलेले हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याने माध्यमांनी या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन दि. १९ ऑगस्ट रोजी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई केली.
कार्यकर्ते नामदेव चौधरी, लीलाधर तायडे व इतर यांना ९ हजार ९१२ रुपयांचा दंड करण्यात आला. रीतसर वसूल करून त्याची पावतीदेखील देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली.तसेच, महापालिकेने ‘नही’ अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला देखील पत्र पाठविले आहे. संबंधित होर्डिंगची कार्यकर्त्यांनी परवानगी घेतली आहे काय याची माहिती द्यावी. नसेल तर कारवाई करावी असेही पत्रात म्हटल्याचे अधिकाऱ्यांनी ‘केसरीराज’ ला सांगितले.