मुद्देमालासह एकास घेतले ताब्यात
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात अवैधपणे गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर एम.आय.डी.सी. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७० किलो गोवंश मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे.


रविवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:२५ वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ रोडवरील स्वामीनारायण मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी शेख जमीर मेहबूब (वय ५४, रा. उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) हा त्याच्या ताब्यातील बजाज कंपनीच्या तीन चाकी रिक्षातून (क्र. एमएच १९ व्हि ७७४५) गोवंश जनावरांची कत्तल करून, विक्रीच्या उद्देशाने मांसाचे तुकडे घेऊन जात होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला अडवले असता, रिक्षामध्ये अंदाजे ७० किलो गोवंश मांस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, रामदास कुंभार, गिरीश पाटील, विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी आणि विनोद आस्कर यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार करत आहेत.








