आशाबाबा नगरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आशाबाबा नगर परिसरात असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी गोपाळ दिनकर चौधरी (वय ५१, रा. आशाबाबा नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दि. ०३ मार्च रोजी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ०२:०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लक्ष्य केले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि घराबाहेर उभी असलेली दुचाकी चोरून नेली. एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे चोरून नेला आहे.
या घटनेबाबत गोपाळ चौधरी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ जितेंद्र राजपूत करत आहेत.









