पिंप्राळा शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पिंप्राळा भागातील आजीटर कॉलनीत राहणाऱ्या एका डॉक्टरांच्या घरी चोरटयांनी चोरी करीत तेथून टीव्ही, चांदी, पैसे, घड्याळ, देवाची मूर्ती असे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. मंदार बाळासाहेब पंडित (वय ३६, रा. आजीटर कॉलनी,पिंप्राळा, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान अज्ञात चोरटयांनी डॉक्टरांच्या राहत्या घरातील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील टीव्ही, चायनीज पैसे, चांदी, देवाची मूर्ती, घड्याळ आदी ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत माहिती होताच डॉ. पंडित यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.