जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गीताई नगर परिसरात एका सोन्याच्या कारागिराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा मोठा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अवघ्या २४ तासांत ही चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १८ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत.
उघडकीस आली
बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता.गीताई नगर येथे राहणारे मालचंद गौरीशंकर सोनी हे आपल्या कुटुंबीयांसह बाहेर गेले असल्याने त्यांचे घर बंद होते.चोरट्यांनी घराबाहेरील सेफ्टी डोअर आणि आतील लाकडी दरवाज्याचे कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला.
सोने-चांदीचे दागिने: सुमारे १५ लाख २० हजार रुपये किमतीचे. रोकड (कॅश): ५० हजार रुपये. एकूण मुद्देमाल: १५ लाख ७० हजार रुपये.
घटनेची माहिती मिळताच मालचंद सोनी यांचे पुतणे नरेंद्र सोनी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करत आहेत. शहरात अचानक वाढलेल्या या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे.








