राजमालती नगरात समाज बांधवांकडून पुतळ्याला अभिवादन
जळगाव ( प्रतिनिधी ) – जगद्गुरू संत रोहिदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्था, जळगावच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राजमालती नगर येथील समाज मंदिरात पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भानुदास विसावे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ), पोलीस उपनिरीक्षक मगन नेहेते, सामाजिक कार्यकर्ते सागर सोनवणे, समाजसेवक दिपक माने प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष किशोर धोरे यांनी संस्थेविषयी माहिती देऊन संत रोहिदास महाराज यांच्या कार्याविषयी सांगितले. यावेळी पदाधिकारी विजय खजुरे, दिपक मेथे, संतोष धोरे, सुनील वाघ, साहेबराव खजुरे, छोटू धोंडे, सचिन पवार, कैलास मेथे, रविंद्र आहेर, सागर कासवे, मनिष धोरे, सुनिल विसावे, हिम्मत मोरे, अक्षय घोरे, गणेश घोरे, मोहन आहेर, कृष्णा रखमे, दिलिप झिरे, कल्पेश आरखे, तुषार आहेर, युवराज धोरे, लखन जिरे, लताबाई धोरे, भागाबाई धोरे, रेखा आहेर, निलिमा धोरे, सुनिता धोरे, उषा धोरे, निर्जला मोरे आदी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.










