जळगाव (प्रतिनिधी ) – अवैध गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर छापा टाकून ९१ हजार ४९३ रूपयांचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्लीत करण्यात आली दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली भागात अवैध गुटखा आणि पानमसाला साठवणूक होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने काल रात्री छापा टाकला. राजाराम नगरातील संतोष हुकमतमल राजपाल यांच्या घरात ६७ हजार ५९५ रूपये किंमतीचे गुटखा आणि पानमसालाचा साठा आढळून आला. संतोष राजपाल याच्या मालकीचे तिजोरी गल्लीतील मिरा ट्रेडर्स नावाच्या दुकानातून २३ हजार ८९८ रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.
पो.कॉ. तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात तर पो ना दिपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी संतोष राजपाल आणि एका १७ वर्षीय मुलावर अशा दोघांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले . पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे आणि पो.कॉ. विजय निकुंभ करीत आहेत.