डीवायएसपींची धडक कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर उघड्यावर दिनांक २० एप्रिल रोजी मध्यरात्री भुसावळातील सिंधी कॉलनीतील ४ तरुण वाढदिवस साजरा करीत असताना पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी चौघांवर नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई केली होती. भुसावळ सत्र न्यायालयात याप्रकरणी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर चौघांना न्यायालयाने प्रत्येकी १ हजार २०० रुपयांचा दंड सुनावला आहे.
निखील अनिलकुमार मूलचंदानी (वय २१), साहिल मनोजकुमार डिसुजा (वय २१), रोहन मोहनलाल रत्नानी (वय २०), हरेष सुंदरलाल सुंदराणी (सर्व रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) अशी शिक्षा सुनावलेल्या मुलांची नावे आहेत. दिनांक २० एप्रिल रोजी मध्यरात्री पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे हे गस्तीवर असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर चौघे रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत होते. पिंगळे यांनी उभयंतांची चांगलीच कानउघाडणी करीत त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर न्या. एम. आर. बगाडे यांनी उभयंतांना १२०० प्रमाणे प्रत्येकी दंड सुनावण्यात आला.