पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पत्रपरिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस दलाने जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८ गंभीर गुन्ह्यांची उकल केली. त्यात डिझेल चोरी करणारी टोळी, रस्ता आडवून रोकड लांबविणारी टोळी, पैशांच्या बॅगांची चोरी, दुचाकी व सायकली चोरी, महागडी चारचाकी वाहने कमी किंमतीत विक्री करणारे चोरटे, मालट्रक चोरी प्रकरण तसेच गावठी पिस्टल बाळगणार्या संशयीताना अटक करण्यात आली. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठगबाजी करून सोन्याची अंगठी चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिगंबर कौतीक न्हावी उर्फ मानकर याला गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी जळगाव शहरातील आसोदा रोडवरील हरिओम नगरातील बोर्डाजवळ अटक केली. आरोपीकडून २५ हजार रुपयांची सोन्याची लगड व अंगठी जप्त करण्यात आली. (केसीएन)वरणगाव शहरातील आंबेडकर नगरात गावठी पिस्तूल बाळगणार्या हरीश उर्फ हर्ष राहुल उजलेकर (१९, रा.आंबेडकर नगर, वरणगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत त्याच्याकडील ४० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, उदय कापडणे, रवींद्र चौधरी यांनी केली.
फैजपूर पोलीस ठाण्यात मालट्रक (एमएच १९ झेडए ५१८१) चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुभाटी गावाजवळील खलटाका थाना पोलीस चौकीत ट्रक जमा असल्याचे मिळून आले. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ संदीप पाटील, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, प्रवीण मांडोळे, बबन पाटील, महेश सोमवंशी यांनी ट्रक क्रमांक (एमएच १९ झेडए ५१८१) हा गुन्हा कामी जप्त केला आहे.
अजिंठा चौफुली ते आकाशवाणी चौक परिसरात महागड्या गाड्या संशयास्पद फिरत होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई केली. तीन महागडी वाहने जप्त करण्यात आली. यात १२ लाख रुपये किंमतीची हुंडाई क्रेटा, १५ लाख रुपये किंमतीची टाटा कंपनीची हॅरियर आणि ४ लाख रुपये किंमतीची मारुती बनेलो जप्त करण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, कॉन्स्टेबल विनोद पाटील, गजानन देशमुख, मुरलीधर धनगर, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील, प्रदीप चौरे, दीपक चौधरी यांनी कारवाई केली.
संशयित आरोपी मजहर रशीद पिंजारी (४३, रा. सालार नगर, जळगाव) यांच्याकडून तीनही वाहने जप्त केले आहे. या तीन वाहनांवर बनावट नंबर प्लेट लावून महागडी कार कमी किंमतीत विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान यातील दोन गाड्यांच्या चोरीप्रकरणी दिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात अजून संशयित आरोपीकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि सायकलींची चोरी झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
त्यांच्याकडून १४ दुचाकी आणि १९ सायकली जप्त केले आहे. याप्रकरणी भूषण जगन्नाथ माळी (वय ४०) आणि विशाल विश्वनाथ माळी (वय २८, दोन्ही रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ८४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.(केसीएन)ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भूषण शेलार, दीपक चौधरी यांनी केली. तसेच, विक्री केलेल्या मालाची रक्कम घेऊन दुचाकीने घरी परतत असतांना यावल ते फैजपूर रस्त्यावर दुचाकी अडवून दोन जणांनी धाक दाखवत सोबतची ३९ हजार ७०० रुपयांची रोकड चोरून नेली होती.
याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी फरदीन कबीर पटेल (वय २४, रा. आयेशा नगर यावल), सोहेल रुबाब पटेल (वय २३, रा.विरार नगर, यावल) आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई फैजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, विनोद गाभणे, विजय चौधरी, राहुल नावकर, असलम खान यांनी केली. (केसीएन)तर पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोर पैशांची बॅग लांबवणारे टोळी पुन्हा सक्रिय झाली असताना गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन यांना दिली व पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड मिळून आली. दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात त्याच्यासाठी रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया दोन्ही रा.गूलखोडी ता. पाचोर जिल्हा राजगढ यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली.