जळगाव (प्रतिनिधी ) – पिंप्राळा परिसरातील खंडेराव नगर रेल्वे रुळाजवळ एक ४५ वर्षे महिला धावत्या रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
सुन्नोदेवी छोटूलाल सहर (वय ४५,रा. हरी विठ्ठल नगर, मूळ रा.उत्तर प्रदेश) असे या मयत महिलेचे नाव आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटवली महिलेचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले होते तेथे त्यांनी आक्रोश केला महिलेच्या पश्चात पती दोन मुले असा परिवार आहे पती छोटूलाल व एक मुलगा आनंद हे रंगकाम करून उदरनिर्वाह करीत होते
याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.