जळगाव: – जळगाव शहर महापालिकेच्या गणपती मंडळापासून शहरातील विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला असून लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन होत आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिसून येत आहे.
आपल्या लाडक्या गणरायाला आज मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे, विसर्जनाचे पूर्ण नियोजन करीत पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. अनंत चतुर्थीला शहरातील ३५३ गणेश मंडळांसह घरगुती गणपतीचे विसर्जन होत आहे. गणरायाचे विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा मोठ्या फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच मिरवणुकांवर आवश्यकतेनुसार ड्रोनची नजर राहणार असून तशी परवानगी पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात स्वागत करुन त्याची घरोघरी स्थापना करण्यात आली होती. अकरा दिवस मनोभावे पुजा करुन अनंत चतुर्थदशीला भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. शहरात विविध ठिकाणाहून विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तर शहरातील मुख्य रस्त्यांवरुन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे विसर्जन मिरवणूक काढून निरोपदिला जाणार आहे. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दलाकडून पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलीस व महिला अंमलदार, आरसीपी प्लाटून, स्ट्रायकींग फोर्स, क्युआरटी पथक असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक,उपअधीक्षकही लक्ष ठेवून राहणार आहे.लेझर लाईट शो- करण्यास मनाई विसर्जन मिरवणुकीत कोणालाहीपक्षता घेतली जात आहे. कोणाच्या डोळ्याला इजा होऊ नये, यासाठी लेझर लाईट, लेझर शोचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.दक्षता घेतली जात आहे. कोणाच्या डोळ्याला इजा होऊ नये, यासाठी लेझर लाईट, लेझर शोचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.