एम. राजकुमार सोलापूरचे पोलीस आयुक्त
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची वर्णी लागली आहे. एम. राजकुमार यांची सोलापूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षकपदी पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची वर्णी लागली आहे.
जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त एमसीव्ही महेश्वर रेड्डी बदलून येत आहेत. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांचीही बदली झाली आहे.
नाशिक परीक्षेत्राच्या महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे.
चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.