जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी ) – कपाशी विकल्यावर मिळालेले सात लाख रुपये घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला अडवुन पिस्तुलाचा धाक दाखवत चोरांनी हिसकावून नेले होते. याबाबत पहुर पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा वेगाने तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने संशयीतांना लुटलेल्या रकमेसह अटक केली .
सेानाळा ता.जामनेर येथील शेतकरी संजय पाटील यांनी त्यांचा कापुस विकला होता. त्याचे ७ लाख रुपये त्यांना मिळाले होते बुधवारी संजय पाटील त्यांच्या दुचाकीने सात लाख रुपये घेवुन घराकडे निघाले होते. पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पप्पु टी स्टॉल जवळ चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचा रस्ता अडवून चाकू आणि पिस्तुलचा धाक दाखवत त्यांच्या कडील पैशांची थैली हिसकावुन पेाबारा केला होता.
घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी स्वतः तपासाची सुत्रे हातात घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांनी गुन्हे शोध पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाला लावले. पो नि किरण कुमार बकाले यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोवीस तासांत गुन्ह्याचा उलगडा केला प्रवीण रमेश कोळी (वय-२६ वाल्मीक नगर), गोपाळ श्रावण तेली (वय-३९, रा.कळमसरा ता.पाचोरा) , प्रमोद कैलास चौधरी (वय-२७, रा.कळमसरा ता.पाचेारा), लाखन दारासिंह पासी (ता.३४, रा.जुना आसोदा रेाड जळगाव) या चौघांना ताब्यात घेण्यात आले .अटकेतील चौघानी समान वाटणी करुन घेतली होती. ताब्यात घेतल्यावर पेालिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सात लाखातून ४ लाख ७४ हजार ४६० रुपये , पाच मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा असा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला .यामुळे शेतकऱ्याने जळगाव पोलीस विभागाचे आभार मानले आहे. या गुन्हेगारांनकडून आनखी काही गुन्हे उघडकीस येणार का याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.