जळगाव शहरातील घटना
जळगाव प्रतिनिधी : शहरातील निवृत्ती नगर परिसरातील एका २८ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हर्षल वासुदेव मोरे (वय २८, रा. निवृत्ती नगर, जि. जळगाव) या तरुणाने २४ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२:०५ वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी पदार्थ सेवन केले होते. प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
रुग्णालयातील या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









