• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात दोन मजली इमारत कोसळल्याने ११ जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2021
in जळगाव
0

नागरिकांच्या सतर्कतेने थोडक्यात जीवितहानी टळली ; इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर 

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शनिपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १७ जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत गुरुवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कोसळली. यामध्ये सुमारे ११ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त असून जीवित हानी झालेली नाही. यामुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जळगावकर सकाळी गुलाबी थंडीमध्ये गाढ झोपेत असताना शनिपेठ भागांमध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महानगरपालिकेची १७ क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे ४ ते ४:३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यासाठी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस माहिती घेण्याचे काम करीत आहेत. यामुळे इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या दोन मजली इमारतीमधिल राहणाऱ्या नागरिकांचे साहित्य सर्व नष्ट झाले आहे. इमारतीमध्ये जसे आवाज व्हायला लागले तसे वरच्या मजल्यावरील काही नागरिक बाहेर यायचा प्रयत्न करू लागले. मात्र ज्या वेळेला इमारत कोसळली तेव्हा खालच्या मजल्यावर असणाऱ्या वृद्ध महिला मात्र अडकून पडल्या. त्यांना जवळच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दगड व इतर मलबा बाजूला सारीत त्यांना बाहेर काढले. त्यांच्या शरीराला प्रचंड जखमा असून मुक्कामार देखील मोठा लागला आहे. ही घटना त्याच इमारतीच्या बाजूला असणाऱ्या एका अनधिकृत बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे घडली असावी असा नागरिकांचा कयास आहे. याबाबत काही नागरिकांनी या पूर्वी पोलीस स्टेशनला देखील तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यानंतर आज ही घटना घडली अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी ‘केसरीराज’ कडे दिल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. त्यांच्यासोबत संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, प्रदीप धनगर, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, रवींद्र बोरसे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, नासिर अली शौकत अली नितीन बारी हे कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

 बाळद शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Next Post

यावलला कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावलला कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon