प्रचाराला जात असताना ममुराबादजवळ घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना आज गुरुवारी सकाळी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे.
आज दि. ३१ रोजी उमेदवार प्रभाकर सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असतांना तालुक्यातील ममुराबाद येथे त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोनवणे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सोनवणे यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून त्यांची तब्येत उत्तम असून ते येत्या चार दिवसात प्रचारासाठी सक्रिय होतील अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.