जळगाव (प्रतिनिधी) – जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलाभ रोहन यांची बुधवारी बदली झाली असून त्यांच्या जागी कुमार चिंथा या आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहन यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. चिंथा यांची गेल्या आठवड्यात अंमळनेर उपविभाग पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. याच पदावर आणखी एका अधिकार्याची नियुक्ती झाली होती. त्यानंतर चिंथा यांची भुसावळला बदली झाल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांना बुधवारी पूर्ण विराम मिळाला.