रावेरमध्ये १८ लाख ११ हजार ९५१ एवढी नोंद ; दोन्ही मतदार संघात तृतीयपंथींची १३७ नोंद
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदार संघात स्त्रिया, पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या १९ लाख ८१ हजार ४७२ एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात १८ लाख ११ हजार ९५१ एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
जळगावं लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद १० लाख ३१ हजार ६० एवढी असून स्त्रियांची संख्या ९ लाख ५० हजार ३२९ एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण ८३ आहेत. अशी सर्व मिळून १९ लाख ८१ हजार ४७२ एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे. रावेर लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद ९ लाख ३७ हजार ५४ एवढी असून महिलांची संख्या ८ लाख ७४ हजार ८४३ एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण ५४ आहेत. अशी सर्व मिळून १८ लाख ११ हजार ९५१ एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे. असे एकत्रित दोन्ही लोकसभा मतदार संघातील एकुण पुरुष संख्या १९ लाख ९८ लाख ११४, एकुण स्त्रीयांची संख्या-१८ लाख २५ हजार १७२ व एकुण तृतीय पंथी संख्या १३७ असे एकुण ३७ लाख ९३ हजार ४२३ मतदार आहेत.
*विधानसभा मतदार संघनिहाय संख्या : जळगाव*
जळगांव शहर विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या २ लाख ७ हजार १९ तर स्त्रीयांची संख्या-१ लाख ८८ हजार ११३, तृतीय पंथी संख्या ३२ असे एकुण ३ लाख ९५ हजार १६४ मतदार आहेत. जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या १ लाख ६६ हजार ३३०, स्त्रीयांची संख्या- १ लाख ५५ हजार ३०२, तृतीय पंथी संख्या -३ असे एकुण ३ लाख २१ हजार ६३५ मतदार आहेत. अमळनेर (एससी) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या १ लाख ५५ हजार २२०, स्त्रीयांची संख्या-१ लाख ४६ हजार १०,तृतीय पंथी संख्या ३ असे एकुण ३ लाख १ हजार २३३ मतदार आहेत. एरंडोल विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या १ लाख ४७ हजार ४७९, स्त्रियांची संख्या १ लाख ३८ हजार ३२२ तर तृतीय पंथी संख्या १० असे एकुण २ लाख ८५ हजार ८११ मतदार आहेत. चाळीसगांव विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या १ लाख ८९ हजार ८०१, स्त्रीयांची संख्या- १ लाख ६९ हजार ८५१, तृतीय पंथी संख्या -२९ असे एकुण ३ लाख ५९ हजार ६८१ मतदार आहेत. पाचोरा विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या १ लाख ६५ हजार २११, स्त्रीयांची संख्या – १ लाख ५२ हजार ७३१ तृतीय पंथी संख्या ६ असे एकुण ३ लाख १७ हजार ९४८ मतदार आहेत.
*विधानसभा मतदार संघनिहाय संख्या : रावेर*
चोपडा (एसटी) विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पुरुष संख्या १ लाख ६४ हजार १५२, स्त्रीयांची संख्या- १ लाख ५६ हजार ५८४, तृतीय पंथी संख्या २ असे एकुण ३ लाख २० हजार ७३८ मतदार आहेत. रावेर विधानसभा मतदार संघात एकुण पुरुष संख्या १ लाख ५३ हजार ८८३, स्त्रीयांची संख्या- १ लाख ४४ हजार ४४७, तृतीय पंथी संख्या-२ असे एकुण २ लाख ९८ हजार ३३२ मतदार आहेत. भुसावळ (एससी) विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या-१ लाख ५४ हजार ५८ स्त्रीयांची संख्या-१ लाख ४३ हजार ५३९ तृतीय पंथी संख्या ३७ असे एकुण २ लाख ९७ हजार ६३४ मतदार आहेत. जामनेर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या१ लाख ६६ हजार ८३७ स्त्रीयांची संख्या- १ लाख ५४ हजार ५१९, तृतीय पंथी संख्या ० असे एकुण ३ लाख २१ हजार ३५६ मतदार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या १ लाख ५१ हजार ६२८, स्त्रियांची संख्या १ लाख ४२ हजार ६८३, तृतीय पंथी संख्या-७ असे एकुण २ लाख ९४ हजार ३१८ मतदार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर विधानसभा क्षेत्र हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तेथील पुरुष संख्या १ लाख ४६ हजार ४९६, स्त्रीयांची संख्या- १ लाख ३३ हजार ७१, तृतीय पंथी संख्या ६ असे एकुण २ लाख ७९ हजार ५७३ मतदार आहेत.