• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. हर्षल माने विरुद्ध आ. मंगेश चव्हाण लढतीचे चित्र !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. हर्षल माने विरुद्ध आ. मंगेश चव्हाण लढतीचे चित्र !

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा हि महाविकास आघाडीच्या वाटाघाटीनुसार शिवसेना (ठाकरे गट) कडे आली आहे. त्यानुसार आता नेत्यांसह कार्यकर्ते कामाला लागले आहे. दुसरीकडे भाजपाचा बालेकिल्ला असलेला या मतदारसंघात विद्यमान खा.उन्मेष पाटील यांचे तिकीट कट होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यांच्याऐवजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आ. मंगेश चव्हाण यांना तिकीट देण्याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करीत आहेत. आ. मंगेश चव्हाण यांना तुल्यबळ लढत देऊ शकणारा उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. हर्षल माने किंवा सौ. वैशाली सूर्यवंशी असे उमेदवार आहेत.  आ. मंगेश चव्हाण विरुद्ध डॉ. हर्षल माने किंवा वैशाली सूर्यवंशी अशी लढत दिसून येण्याची शक्यता आहे.

लोकसभेसाठी शिवसेनाकडे डॉ. हर्षल माने हे सक्षम उमेदवार असून त्यांच्यासह पाचोरा येथील शिवसेनेचे सौ. वैशाली सूर्यवंशी यांनाही लोकसभा उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांची मागणी आहे. दोघांचा उत्तम जनसंपर्क असून उच्चशिक्षित व्यक्तिमत्वाची मतदारसंघाला गरज आहे. डॉ. हर्षल माने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असून ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहे. एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात शिवसेनेचे जनसंपर्क संघटन निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कंबर कसली असून गाव तिथे शिवसेना हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. लोकसभेमध्ये अभ्यासू खासदार व जळगाव जिल्ह्यासह खान्देशाचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम खासदार असणे महत्वाचे झाले आहे.  याचकरिता आता डॉ. हर्षल माने यांना उमेदवारी देऊन त्यांना लोकसभेत निवडून देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून होत आहे.

सौ.वैशाली सूर्यवंशी शिवसेनेच्या नेत्या असून त्यांचे पिता दिवंगत आर. ओ. तात्या पाटील यांच्या समृद्ध राजकीय वाटचालीचा त्यांना वारसा आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यासह वैशालीताई यांना अमळनेर, एरंडोल, पारोळा तालुक्यातून देखील त्यांचे वलय आहे. सौ.वैशाली सूर्यवंशी ह्या कृषी क्षेत्रातील पदवीधर आहेत. निर्मल सीड्सच्या त्या संचालक आहे. त्यामुळे त्या देखील सक्षम व संभाव्य उमेदवार आहेत. दुसरीकडे भाजपाकडे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे पुन्हा इच्छुक असले तरी यावेळी पक्षाकडून उमेदवार बदल करण्याची चिन्हे सुरु आहेत. चाळीसगावचे तरुण आ. मंगेश चव्हाण यांच्या विकासकामांचा धडाका पाहता त्यांना यंदा खासदारकीचे तिकीट देण्याच्या हालचाली सुरु आहे. आ.मंगेश चव्हाण यांना पाचोऱ्यातून अमोल शिंदे, पारोळ्यातून करण पवार, अमळनेरातून स्मिताताई वाघ, जळगावात राजूमामा भोळे यांच्यासह इतर ठिकाणी मित्रपक्षांच्या मदतीने विजयी होण्याची ‘गॅरंटी’ आहे.

डॉ. हर्षल माने यांचा परिचय
डॉ. हर्षल माने हे बीएएमएस असून शिवसेनेत २००५ पासून सक्रिय आहेत. शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी डॉ. दीपाली हर्षल माने या शिरसमणी-मंगरूळ गटात पंचायत समिती सदस्य होत्या. तसेच डॉ. दीपाली या चोरवड येथे  सरपंच पदावर १० वर्षे होत्या. डॉ. हर्षल माने हे  २००८ पासून शिवसेना ग्रामीण मध्ये उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करीत असून आता तीन वर्षांपासून जिल्हाप्रमुख पक्षाने जबाबदारी दिली आहे. डॉ. हर्षल माने हे जिल्हा परिषद शिरसमणी-मंगरूळ गटातून राष्ट्रवादीच्या पराग वसंत मोरेंचा पराभव करून विजयी झाले होते. यासह ते  पारोळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदारपुत्र अमोल चिमणराव पाटील यांचा पराभव करून विजयी झालेले आहेत. यामुळे आ.मंगेश चव्हाण विरुध्द डॉ हर्षल माने लढत होण्याची शक्यता आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalgaon-loksabha-dr-mane-x-chvhan/
Previous Post

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरातील किर्तन, सत्संगात डॉ केतकी ताई पाटील मंत्रमुग्ध

Next Post

घरफोडी करणाऱ्या संशयिताला एलसीबीने पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडी करणाऱ्या संशयिताला एलसीबीने पकडले

घरफोडी करणाऱ्या संशयिताला एलसीबीने पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon