अटीतटीच्या लढतीत मंत्री गुलाबराव पाटील, आ. भोळेंना मतदारांचा दणका
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुका बाजार समितीवर महाआघाडीचे वर्चस्व राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी वर्चस्व सिध्द केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ११ जागांवर विजय मिळवला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आ. सुरेश भोळे यांनी शिंदे गट – भाजपची सत्ता येण्यासाठी केलेले प्रयत्न विफल ठरले.
विजयी उमेदवारांमध्ये हमाल मापाडी मतदार संघ यमुना सपकाळे, व्यापारी मतदार संघात संदीप पाटील, अशोक राठी, आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात अरुण पाटील, अनुसूचित जाती व जमाती मतदार संघात दिलीप कोळी, सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघात सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी, लक्ष्मण पाटील, प्रभाकर सोनवणे, शामकांत सोनवणे, योगराज सपकाळे, जयराज चव्हाण, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात मिलींद चौधरी, अपक्ष पल्लवी देशमुख, विशेष मागासप्रवर्ग व विजाभज मतदार संघात समाधान धनगर, ओबीसी मतदार संघात पांडुरंग पाटील, महिला राखीव मतदार संघात लिना महाजन, हेमलता नारखेडे हे विजयी झाले. यात भाजपचे प्रभाकर सोनवणे, मिलींद चौधरी, अशोक राठी, समाधान धनगर तर शिंदे गटाचे यमुना सपकाळे आणि हेमलता नारखेडे हे विजयी झाले.