जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज नवे ८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या विस्फोटाकडे जिल्ह्याची वाटचाल आता सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे .
आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजची सर्वाधिक म्हणजे ३१ एवढी रुग्णसंख्या जळगाव शहरातील आहे . आज कोरोनातून बरा झालेला १ रुग्ण घरी परतला आहे .
जळगाव शहर – ३१ , , भुसावळ- २४ , चोपडा- २७, यावल -०२ , रावेर -०१ चालीसगांव -० ३ , असे एकुण ८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४ ३ हजार ४० पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २०३ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात सध्या १० रुग्ण उपचार घेत आहेत . डी सी एच असे कक्षातील रुग्णांची संख्या ९ आणि डीसीएच कक्षातील रुग्णांची संख्या ०५ आहे . जिल्ह्यातील एकूण २२३ रुग्णांपैकी २०३ लक्षणे नसलेले आणि २० लक्षणे असलेले आहेत , असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले .