जळगाव शहरातील काबरा हॉस्पिटल येथे 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान करण्यात आले आहे. या मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रफुल्ल काबरा यांनी केले आहे.
जळगाव शहरातील प्रभात कॉलनी, प्रभात चौकात असणाऱ्या शानबाग हॉलमागे डॉ.प्रफुल सुनील काबरा यांचे काबरा हॉस्पिटल असून या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात हृदयविकार, उच्च रक्तदाब, निद्रानाश, डोकेदुखी, थकवा ,फिट येणे, दमा ,एलर्जी, जुनाट खोकला ,ताप व रक्तपेशींचे आजार ,मलेरिया, टायफाईड, संधिवात ,कंबरदुखी, मान, पाठ व हाडा संबंधी आजार ,मधुमेह थायरॉईड, ऍसिडिटी, कावीळ, लिव्हर सोरायसिस ,डायरिया, कॉलरा ,लघवीचे इन्फेक्शन ,आदी रोगांवर उपचार करण्यात येणार आहे.
डॉक्टरांच्या तपासणी नुसार या सुविधा मिळतील मोफत
शुगर चरबीचे प्रमाण, रक्तदाब, ऑक्सिजन लेवल ,थायराइड, कोलेस्ट्रॉल, फुफुसांची कार्यक्षमता चेक करणे आदी.याठिकाणी विविध प्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असून या शिबिरात येणाऱ्या रुग्नांची डॉक्टरांची तपासणी फी मोफत असून या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णाणी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रफुल्ल काबरा यांनी केले आहे.