जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. आता जागृत जनमंचने या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका गुंडाळून ठेवणारी जागृत जनमंचची ही भूमिका प्रस्थापितांचे राजकारण कितपत हादरवणार याची उत्सुकता आता वाढली आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांना उमेदवारी करायची आहे,ज्यांची मदतीसाठी वेळ देण्याची तयारी आहे. अशा लोकांची बैठक आज जागृत जनमंचने आयोजित केली होती.
शेतकऱ्यांची सहकारी बँक शेतकऱ्यांच्या ताब्यात आली पाहिजे , जे आधी संचालक होते, आहेत त्यांच्या विरोधात उमेदवार आम्ही देणार आहोत. जे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवार देणार , मतदारांना प्रेरणा देणारा कार्यक्रम बनवला जाईल., सध्याच्या संचालकांनी अतिरिक्त कर्ज उचलले.त्याबाबत उहापोह होईल, जेडीसीसी खाजगी बँक बनू नये, जेडीसीसीवर प्रस्थापित नेत्यांनी वारसाहक्क गाजवू नये , नवोदितांना संधी द्यावी., प्रस्थापितांना बिनविरोध सत्ता देऊ नये ; अशी भूमिका जागृत जनमंचने जाहीर केली आहे.
शिवराम पाटील ( जळगाव ), डॉ.पृथ्वीराज पाटील ( पारोळा ), डॉ. रवींद्र पाटील ( चोपडा), डॉ.सरोज पाटील ( धरणगाव ), ईश्वर मोरे, निलकंठ पाटील (पाचोरा ) , प्रशांत चौधरी ( रावेर) , एन.जे.पाटील ( जळगाव ) , नितीन चौधरी ( खिरोदा ) , संतोष पाटील ( अमळनेर ) , प्रफुल्ल पाटील ( असोदा ) , अनिल नाटेकर (जळगाव),. अमोल कोल्हे ( जळगाव) , राकेश वाघ ( जळगाव ), अँड.भरत पाटील ( जळगाव ) , अँड.एस.आर पाटील (जळगाव) , अँड.नामदेव कोळी (जळगाव ), अँड.चिंचोरे (जळगाव ) , डॉ सुभाष राणे, सुनिल पाटील, उमाकांत वाणी, राकेश वाघ आदी आजच्या सैनिक कल्याण सभागृहातील बैठकीत उपस्थित होते.
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी असे जिल्ह्यातील सेना, भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादीतील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, एकनाथ खडसे, संदिप पाटील यांनी ठरवले आहे. बिनविरोध संचालक मंडळ बनवून घरातच चालवायचे. जेडीसीसीची तिजोरी खिशात घालायची.असा हा कार्यक्रम राबवला जात आहे. दिवसा विरोधक आणि रात्री सहोदर असा नौटंकी खेळ चालू आहे. हे पाहून जिल्ह्यातील लोकांनी निराशेचा,तिरस्काराचा सूर काढला.आहे म्हणून आम्ही ही भूमिका घेतल्याचे जागृत जनमंचने सांगितले.
पुन्हापुन्हा तेच संचालक, चेअरमन मग,आम्ही काय करायचे? लोकांना असा प्रश्न पडला. त्यामुळे .वंचितांनी दंड ठोकून बंड करायचे व निवडणूक लढायची असे आज ठरवण्यात आले. आजच्या बैठकीसाठी आलेले सगळेच स्वखर्चाने आले होते. उत्स्फ़ुर्त सहभागी झाले होते. त्यांनी चर्चेत भाग घेतला. सुचना दिल्यात. केल्या अनुभवाचे बोल सांगितले , अशी माहिती शिवराम पाटील यांनी दिली.
आजी माजी संचालक व आजीमाजी आमदारांच्या विरोधात उमेदवारी करणे. बँकेतील मक्तेदारी मोडून काढणे. बँकेतील काळेगोरे खोदून काढणे.जेणेकरून बँक लुटायची कोणी सराईत चोराने हिंमत करू नये . जिल्हा सहकारी बँक ही शेती विकासासाठी आहे. कर्ज देणे घेणे सोपे करण्यासाठी आहे.विकास सोसायटी, दूध फेडरेशन जगवणारी आहे.पण तिचा उपयोग साखर कारखाना, हायवेवरील जमीन घेण्यासाठी करीत असतील तर लगाम लावलाच पाहिजे. पन्नास हजाराच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वणवण फिरवले जाते आणि पंचावन्न कोटी संचालकाला साध्या अर्जावर मिळतात.हे थांबवणे गरजेचे आहे.पैसा शिल्लक नाही असे उत्तर शेतकऱ्यांना देणारे संचालक कोटी कोटीचे कर्ज उचलतातच कसे?असा प्रश्न करणारे संचालक जिल्हा बँकेत बसले पाहिजे.
जिल्ह्यातील आमदार लोकशाही मार्गाने निवडून आलेत.आणि आर्थिक संस्थेत निवडणूक नको.या दुष्ट हेतुविरोधात आम्ही जिल्हा जागृत जनमंच जनजागृती अभियान राबवत आहोत. ही जळगाव बदलाची नांदी आहे. आम्ही प्रत्येक तालुक्यात दौरा करू.शेतकऱ्यांना प्रेरित करू., असेही शिवराम पाटील म्हणाले.







