लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वात वडली गावातील अनेकांचा जाहीर प्रवेश
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडली येथे भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा यांनी सकाळी भेट दिली. अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी, युवक, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी देखील यावेळी प्रतिसाद दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष लकी टेलर यांनी त्यांचे गुलाब रुमाल, पक्षाचे माहिती पत्रक देत बीआरएस पक्षात स्वागत केले. यावेळी “अबकी बार किसान सरकार” , केसीआर साहेबांचा विजय असो, बीआरएस पक्षाचा विजय असो, लकी अण्णा तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल झाले पाहिजे..झालेच पाहिजे या घोषणांनी सर्वत्र परिसर दुमदुमून गेला.
बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी गोर गरीब जनतेच्या हित आणि शेतकरी बांधवांच्या विकासात्मक दृष्टीने सुरू असलेल्या कार्याबद्दल तसेच तेलंगणा राज्यातील जनतेला विज, पाणी तसेच इतर सुविधा यासंदर्भात जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांनी उपस्थितांना माहिती देत संवाद साधला. केसीआर यांची देशातील जनतेसाठी असलेली दुरदृष्टी याविषयी तेलंगणा राज्य आता खऱ्या अर्थाने रोल मॉडेल झाले असून, आज महाराष्ट्रात याची गरज आहे . जनतेच्या हितासाठी आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा सर्वत्र फडकवूया असा निर्धार असल्याची भावना बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी वडली येथील सचिन पाटील , समाधान पाटील , रविंद्र पाटील, सुनिल पाटील, बंटी पाटील, सतिश शेकुकारे, अनिल पाटील, कार्तिक पाटील, निलेश सुनिल पाटील, जितेंद्र पाटील, पवन पाटील, पवन पाटील, धनंजय पाटील, सागर पाटील , केतन सुभाष बाविस्कर, मनिष पाटील , धनंजय पाटील, दीपक पाटील, कृष्णकांत पाटील, कुणाल गोपाल पाटील, तेजस संजय पाटील, प्रफुल्ल पाटील, हर्षल पाटील, गोकुळ सोनवणे, संतोष पाटील, अक्षय पाटील, हिरामण धोबी यांसह इतर रहिवाश्यांनी भारत राष्ट्र समिती जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पक्ष संघटन बांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली . यावेळी जळगाव शहर समन्वयक भिकन सोनवणे उपस्थित होते.