जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजप गटनेते म्हणून ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे पत्र भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. यामुळे आता उद्याच्या महासभेतील घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत
उद्या महापालिकेची महासभा आहे. यात स्थायी समिती सभापती व सदस्य निवड होणार आहे. राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या तीन बंडखोर सदस्यांनी घरवापसी केली. आता गटनेतेपदाबाबत घडामोडी समोर आल्या भगत बालाणी यांनी आपण गटनेता व राजेंद्र पाटील उपगटनेता असल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले व आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचा दावा केला

महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळी बंडखोरी करून २७ नगरसेवकांनी भाजपला मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून पक्षादेश झुगारला होता याबाबत या २७ नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेचे अपिल दाखल आहे. या बंडखोर नगरसेवकांनी मीटिंग घेतल्याचा बनाव करून भाजप गटनेता व उपगटनेता बदलाबाबतचे पत्र महापौर यांना दिले व महापौरांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवले आहे; ते ग्राह्य धरू नये असे बालाणी यांनी पत्रात नमूद केलेले आहे. दुसरीकडे विभागीय आयुक्तांनी भाजपच्या २७ सदस्यांना अपात्र का करू नये अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत.







