मुक्ताईनगर :–महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना संलग्नित जिल्हा कोतवाल संघटनेची नवीन कार्यकारिणी राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांचे निरीक्षणाखाली वरणगाव येथील नागेश्वर मंदिर सभागृहात कोतवाल जिल्हा मेळाव्यास गठीत करण्यात आली .
मेळाव्यास राज्य समन्वयक प्रवीण कर्डक,जितु रिपोटे ,रतन खैरनार निरिक्षक म्हणून उपस्थित होते.मावळते जिल्हाध्यक्ष विजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष सदनिका भदाणे, उपाध्यक्ष अमोल पाटील,जितेश चौधरी, कार्याध्यक्ष सुपडु कोळी,जिल्हा सचिव प्रवीण सरगर, जिल्हा सरचिटणीस सुनील खराटे,राज्य सदस्य म्हणून प्रवीण चिखलकर, राज्य उपाध्यक्ष दिलिप सावळे व इतर सदस्यांची निवड करण्यात आली . मेळाव्यास प्रवीण कर्डक यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन डॉ दिलीप सावळे यांनी केले .








