जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव महापालिकेत आपल्या पक्षाच्या महापौर झाल्या. भगवा फडकला आहे. हि सत्ता आपली आहे,सत्त्तांतर जळगावच्या जनतेसाठी झाले आहे . हे सत्तांतर जनतेच्या विकासासाठी , जनतेसाठी आणि जळगावचा पूर्ण कायापालट करण्यासाठी झाल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जळगावात आयोजित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत ,पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आ. चंद्रकांत पाटील,आ. किशोर पाटील, महापौर जयश्री ताई महाजन , माजी महापौर नितीन लड्ढा ,उपमहापौर कुलभूषण पाटील , जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,हर्षल माने , महानगर प्रमुख शरद तायडे, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.