जळगाव( प्रतिनिधी ) – शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या युवकाचा सिंधी कॉलनी परिसरात इलेक्ट्रिकचे काम करीत असतांना त्याला शोक लागून टाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५ : ३० वाजेच्या सुमारास येथे घडली असून याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय प्रल्हाद साठे (वय २४) रा. हरीविठ्ठल नगर असे मयत युवकाचे नाव आहे.
सिंधी कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ईलेक्ट्रीक करण्याचे काम अक्षय याने घेतले होते. त्यानुसार तो आज सायंकाळी काम करीत असताना त्याला विजेचा जोरदार शॉक बसल्याने तो खाली पडला. त्याच्या सहकार्यांनी त्याला त्वरित जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तातडीने दाखल केले . मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अक्षय साठे याला मयत घोषित केले.
याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे.