जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात शुक्रवारी १४ जानेवारीरोजी दिवसभरात २६६ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर ३९ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर- १११ , जळगाव ग्रामीण- ०१ , भुसावळ – ७१ , अमळनेर- ०६ , चोपडा- ३५ , पाचोरा – ०२ , भडगाव -० , धरणगाव -०१ , यावल- ०३ , जामनेर-०१ , एरंडोल – ०१ , रावेर- ०२ , पारोळा -०२ , चाळीसगाव – २९ , मुक्ताईनगर -० , बोदवड – ० , आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ४२८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १५१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही .