जळगाव (प्रतिनिधी ) -येथे असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ आज सकाळी बाळाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नगराकडे जाणार्या रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील बाजूला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आज सकाळी बाळाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भातील माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी घेऊन बाळाच्या मृतदेहाचे शविच्छेदन आणि पंचनामा करण्यात आले. बाळाला कुणी फेकले याचा पोलीस शोध घेत आहे.