जळगाव (प्रतिनिधी ) लग्न आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने महिला गंभीर झाल्याची घटना १० रोजी सायंकाळी कालिंकामाता चौकात घडली असून याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती कि,
फिर्यादी सोनाली सतिष लावणे वय-31 धंदा घरकाम रा. केदार नगर, गट नं. 201, प्लट नं. 13, पिंप्राळा परीवारासह राहतात. दिर भुषण लावणे यांचे जळगांव येथे दि.10 रोजीका.ऊ. कोल्हे शाळेजवळ लग्न लावल्यानंतर त्यांच्या आई शोभाबाई बारी आणि वडील राजू बारी हे लग्न लावुन डबलसिट पारोळा येथे घरी जात असतांना सायंकाळी 05.50 वा.चे सुमारास कालंकामाता मंदीराजवळील वळणावर रोडवर मोटर सायकलला भुसावळ कडुन येणारा ट्रक क्र.GJ-03/AT 0461 टाकणे धडक दिली. यात ट्रकचे चाक शोभाबाई हिचे दोन्ही पायांवरुन गेल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्या. . राजु बारी यांना पायांना खरचटले. सरकारी दवाखान्यातील डक्टरांनी आई शोभाबाई हिचे पायांवर उपचार केल्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी औषधापचाराकामी मुंबई येथील आय.एन.एस. अश्विनी हस्पीटल, कुलाबा मुंबई येथे दवाखान्यात औषधोपचार घेत आहेत.. तरी दि.10 रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास कालंकामाता मंदीराजवळील वळण रस्त्यावर मालट्रक क्र. GJ-03/AT-0461 वरील चालक याने त्यांचे मोटर सायकलीस ठोस मारुन त्यात शोभाबाई राजू बारी यांचे दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून राजु वामन बारी दो. रा. गोंधळवाडा, पारोळा यांचे किरकोळ दुखापतीस व त्यांचे ताब्यातील बजाज प्लटीना मो.सा.क्र. MH-19/BQ-6991 हिचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.