जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून आता आलेल्या प्रशासनाच्या अहवालानुसार ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून कोरोना ग्रस्तांची संख्या ९०७ झाली असून आतापर्यंत शंभरच्या वर कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जळगाव शहर ७, भुसावळ ७, अमळनेर ४, भडगाव १, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, जळगाव ग्रामीण १, रावेर ५ आणि पारोळा ५ असे एकुण ३६ कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांचा आकडा ९०७ वर पोहचला आहे.