नशिराबादला ३२ लाखांचा गुटखा पकडला
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदीत शुक्रवारी दि. १५ रोजी तब्बल ४१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड पकडली असून नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३२ लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी “केसरीराज”शी बोलताना दिली.
रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६ लाख ७० हजार, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत ६ लाख, एमआयडीसी पोलीस स्टेशनने २ लाख ७५ हजार, जामनेर पोलीस स्टेशनला १७ लाख रुपये, फत्तेपूर येथे ३ लाख, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला १ लाख तसेच भुसावळ तालुका, बाजारपेठ, वरणगाव पोलीस स्टेशन मिळून ५ लाख रुपये असे एकूण ४१ लाख ४५ हजार रुपये पोलिसांनी नाकाबंदीत जप्त केले आहे. त्याबाबत चौकशी सुरु आहे.
दुसरीकडे, नशिराबाद पोलीस स्टेशनला ३२ लाख रुपयांचा गुटखा सापडला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गैरकृत्य करणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत कारवाई कायम सुरु राहील, अशीही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.