रावेर तालुक्यात निंभोरा येथील परिवाराला दिलासा
चंदकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील दोन्ही तरुण मुलांचा जळगाव तालुक्यात अपघात झाला होता. यातील एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या जखमींवर उपचार सुरु आहे. या जखमी मुलाला शस्त्रक्रियेसाठी मदत म्हणून होमगार्ड युनिटतर्फे ३१ हजार ५०० रुपये त्याच्या कुटुंबाना देण्यात आले.
निंभोरा बुद्रुक येथील काही दिवसा पूर्वी महिला होमगार्ड विजया सुपडू फेगडे यांचे दोन जुळी मुले जळगावकडे जात असताना त्यांचा अपघात झाल्याने एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर दुखापत झाल्याने त्याचे ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने सावदा युनिटचे समादेशक दीपक खाचणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा येथील होमगार्ड प्लाटून अधिकारी संतोष काटोले, प्लाटून अधिकारी भास्कर जाधव यांनी तसेच ५४ होमगार्डाने एकत्रित येऊन पोलीस व काही ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुमारे ३१ हजार ५०० रुपयाचा निधी विजया फेगडे व त्यांच्या परिवार यांना देऊन मदत केली आहे. यावेळी समादेशक खाचणे, प्लाटून अधिकारी काटोले, होमगार्ड राजेश पाटील, विलास महाले, देवानंद मसाने, विजय चौधरी, समाधान कोळी, अमोल अजलसोंडे, प्रवीण तायडे यासह होमगार्ड उपस्थित होते.