• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेतकऱ्यांसाठी कमी उत्पादन खर्चात येणाऱ्या टोमॅटो शेतीकडे वळावे – मीलन चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2022
in खान्देश, जळगाव
0

जैन इरिगेशन व कागोमे कंपनीतर्फे शिरसोली येथे पीक परिसंवाद संपन्न

शिरसोली (प्रतिनिधी) – कमीतकमी काळात व कमी खर्चात टोमॅटोचे फायदेशीर पीक म्हणून टोमॅटोकडे वळावे. बाजारपेठेत ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास करून जैन इरिगेशनसारख्या उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आता काळाची गरज ठरली आहे. असे विचार कागोमे कंपनीचे भारतातील प्रमुख मीलन चौधरी यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि, जापान स्थित कागोमे फूडस् इंडिया यांच्या संयुक्तविद्यमाने ‘टोमॅटो-कांदा करार शेती व पीक परिसंवाद’ 22 जानेवारी 2022 रोजी आयोजला होता त्यात ते बोलत होते.

मेळाव्यात पूर्व मशागत, पांढरा कांदा, मिरची, टोमॅटो रोपांची लागवड पाणी व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, फर्टिगेशन, कीड-रोग व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ अनिल ढाके, गौतम देसर्डा, जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, कृषी पर्यवेक्षक शरद पाटील, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, डॉ. बी.के. यादव, पांढरा कांदा करार शेतीत सहभागी शेतकरी सुरेश अस्वार, श्रीराम पाटील, श्री गजानन ठिबकचे संचालक पी. के. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

जैन इरिगेशन व कोगोमे दोन्ही कंपन्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्य सुरू केले आहे. जैन इरिगेशन व कोगोमे कंपनी मिळून टॉमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यात येथील मातीवर येणाऱ्या टोमॅटो पिकावर खूप मोठे कार्य होणार आहे. शेतकऱ्यांना कोगोमे कंपनीने टोमॅटोची उच्च तंत्रज्ञानाने विकसित केलेली रोपे उपलब्ध करून दिली. त्याच बरोबर जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन व अॅग्रोनॉमिकल सपोर्ट, वेळोवेळी ग्रामसेवकांचे मार्गदर्शन यामुळे टोमॅटोमध्ये शेतकरी यशस्वी झालेले आहेत. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर ज्यांच्या शेतात हा कार्यक्रम होत आहे ते शेतकरी सुरेश अस्वार यांनी एकरी भरघोस टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्यांनी 12 टन टोमॅटो हार्वेस्ट केला व अजून शेतात 15 ते 20 टन टॉमॅटो काढायचा बाकी आहे. ही कमाल कागोमेची व्हरायटी व जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान यांची आहे असे कोगोमेचे चौधरी यांनी आवर्जून सांगितले.

पिकांची अवस्था, जमिनीच्या पोत व आवश्यकता नुसार पाणी व खतांचे काटेकोरपणे नियोजन आवश्यक आहे. मल्चींग खाली ठिबक सिंचन अवलंबणे कठीण असते. ड्रीपर तासाला किती लीटर पाणी देणारा असेल, जमीन कशी, पीक कोणते या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने विचार करणे त्यापद्धतीने नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. टोमॅटो अथवा भाजीपाला पिके अत्यंत संवेदनशील असतात ठिबक सिंचन व मल्चिंग यांचा सुयोग्य वापर करावा असे आवाहन करून ठिबक व मल्चिंगसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत डी. एम. बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच टोमॅटो व आले, हऴद पिकाची देखील लागवड करावी. जैन कंपनीने मसाले उत्पादन सुरू केले आहे त्यासाठी मिरची, हळद, आले यांची आवश्यकता असते. स्थानिक शेतकऱ्यांकडून माल उपलब्ध करून शेतकऱ्यांचे भले करण्याचे जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंचे तत्त्व पाळले जात आहे. शेतकऱ्यांसाठी कंपनीने मिरची, कांदा, टोमॅटो व आल्याचे रोपे उपलब्ध करून दिलेले आहेत याबाबत कंपनीचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सांगितले. शेतकऱ्यांना रोगमुक्त (डिसिज फ्री), बायोडिग्रेडीबल कपातील रोपे (टोमॅटो, मिरची, कांद्याची) खोक्यात कसे उपलब्ध केले जातात त्याबाबत प्रात्यक्षिक देखील शेतकऱ्यांना दाखविले गेले.

करार शेती व शेती व्यवस्थापन याबाबत जैन इरिगेशनचे पांढरा कांदा, टोमॅटो करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व काय करायला हवे याबाबत माती परीक्षण करून नेमकेपणाने खते, सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन करणे यावर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

ज्यांनी टोमॅटोची लागवड केली असे शिरसोलीचे प्रयोगशील सुरेश अस्वार, युनायटेड जेनेटिक्स प्रा. कंपनीचे व्यंकट पवार, जैन इरिगेशनचे रोशन शहा यांनी सुसंवाद साधला. विजेचा पंप मोबाईवरच नियंत्रीत करता येणारे पुणे येथील मोबाईल डिव्हाईसच उत्पादक सार्थक कंट्रोल्सचे संचालक रोहन टाटीया यांनी देखील त्यांच्या सार्थक मोबाईल ऑटो डिव्हाईसची सोदाहरण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पाटील यांनी तर आभारप्रदर्शन व्ही आर सोळंखी यांनी केले. या मेळाव्यास शिरसोली, जळके, विटनेर, नशिराबाद, पाचोरा पंचक्रोशीतील स्त्री-पुरुष शेतकरी उपस्थित होते.


 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH#maharashtra #bharat
Previous Post

जळगावात घरफोडी : ३६ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

युवासेना युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

युवासेना युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon