• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2022
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – नव्या पिढीत अहिंसा, सहअस्तित्व, संरक्षण और सर्व जीवांच्याप्रती आत्मियतेची भावना वृद्धींगत व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दर वर्षी गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबीर घेतले जाते. ह्या शिबिराचे औपचारिक उद्घाटन 21 रोजी झाले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन आयंगार, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, रिसर्च डीन गीता धरमपाल, डॉ आश्वीन झाला यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले. भारतातील 56 व नेपाळ येथील 4 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यात विविध प्रकारचे सत्र होणार आहेत. या शिबिराचा समारोप 1 जानेवारी 2023 ला होणार आहे.

सध्याच्या परिस्थिती संदर्भात गांधीजींच्या विचारांच्या प्रासंगिकतेच्या आधारे नेतृत्व तयार करणे या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नव्या पिढीतील युवकांना शांतता दूत बनवणे, व्यक्तिमत्व घडवून त्याच्या ज्ञान व परिश्रमाने समाज घडवणे, चारित्र्य घडवून राष्ट्र निर्माण करणे, पर्यावरण आणि विकासावर आधारित नेतृत्वाची निर्मिती करणे याच बरोबर तरुणांना अहिंसक जीवनशैलीवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणे, सार्वजनिक प्रशासन आणि सार्वजनिक धोरणावर आधारित नेतृत्वाची निर्मिती, संघटनेची भावना निर्माण करणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि शासन प्रक्रियेत त्यांचे नेतृत्व निर्माण करणे इत्यादि या शिबिराचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलननाने शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले. डॉ. सुदर्शन आयंगार, डीन गीता धरमपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सौ. अंबिका जैन, डॉ. झाला, गिरीश कुळकर्णी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिती शहा यांनी केले.

या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना क्षेत्र भेट, प्रशिक्षण / कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य भूमिका, गट असाइनमेंट, ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव, प्रवास, संप्रेषण, समुदाय संवाद, व्याख्यान, माध्यमांचे विविध प्रकार प्रशिक्षणासाठी उपयोगात आणले जातात. या गांधीयन लिडरशीप शिबिरात सहभागी झालेल्यांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. नेतृत्व क्षमता वाढीसाठी युवा शिबिरामध्ये विशेषत: एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी संघ, राज्यशास्त्राचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि क्षेत्रीय स्तरावर युवा शाखा हाताळणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.

गांधी रिसर्च फाउंडेशन ही जळगाव, महाराष्ट्र येथे स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था नवीन पिढीला अहिंसा, सहअस्तित्व इत्यादिंची शिकवण देते. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्थानिक आणि जागतिक स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. उदाहरणार्थ, विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, क्षेत्रात मोठे काम केले आहे. ग्रामविकास, ग्रामीण रोजगार, प्रशिक्षण यासारखे अनेक लोकाभिमुख कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे केले जाते. ‘खोज गांधीजीकी’ जगातील सर्वात मोठ्या व पहिल्या क्रमांकाचे ऑडियो गाइडेड व मल्टीमीडिया संग्रहालय म्हणून लौकीक मिळविलेला आहे. त्या माध्यमातून गांधीजींच्या जीवन कार्याचा अभिनव रितीने या संग्रहालयास भेट देणाऱ्यांना परिचय होत असतो. वर्षातून देश- विदेशातील हजारो व्यक्ती खोज गांधीजीकी या संग्रहालयास भेट देतात. युवकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातील एक भाग असलेल्या या राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिराकडे पाहिले जाते.

फोटो कॅप्शन – गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. सुदर्शन आयंगार, डीन गीता धरमपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई आणि डॉ. आश्वीन झाला.


 

 

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वाहन अंगावर नेवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

Next Post

मराठा समजा बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे निलंबित पो.नि. किरणकुमार बकाले विरुद्ध कारवाई कधी?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा समजा बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे निलंबित पो.नि. किरणकुमार बकाले विरुद्ध कारवाई कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon