जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे सचिव जीतमल तापरिया यांचे सुपुत्र पीयूष तापरिया यांनी वाणिज्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील सी.एफ.ए. ही परीक्षा उत्तीर्ण केली. ही बाब जळगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची ठरली आहे. पीयूष यांनी या आधीच सी.ए. आणि सीएस यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. वाणिज्य क्षेत्रातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेमुळे त्याच्या कारकीर्दित अजून एक मोरपीस रोवले गेले आहे. त्याच्या या यशाबद्दल पीयूषचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.