जळगाव (प्रतिनिधी) : – महिलांमध्येही जैन इरिगेशन ची माजी खेळाडू नीलम घोडके( मुंबई) पुरस्काराने सन्मानित जळगाव -: महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२२-२३ साला करिता कालच घोषित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये कॅरम ह्या खेळाकरिता जैन इरिगेशनचे खेळाडू श्री. संदीप दिवे (मुंबई ) आणि अभिजीत त्रिपाणकर ( पुणे ) यांना खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्येही जैन इरिगेशनचीच माजी खेळाडू कुमारी नीलम घोडके ( मुंबई )हिला सुद्धा कॅरम ह्या खेळाकरिता खेळाडू म्हणून पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहे. वरील तीन खेळाडूंशिवाय जैन इरिगेशनचे कॅरम खेळाडू श्री. पंकज पवार , श्री अनिल मुंडे व श्रीमती आयशा खान या सर्वांना यापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा हा मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
ह्या तिन्ही खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार घोषित झाल्यामुळे जैन इरिगेशन मध्ये उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण कॅरम क्षेत्र करिता अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, संचालक श्री.अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी श्री. अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक श्री.सुरेश बुरकुल व श्री. रवींद्र धर्मेंद्र धर्माधिकारी, कॅरम व्यवस्थापक श्री.सय्यद मोसिन व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.