जळगाव ;- अक्षयतृतीयाच्या शुभदिनी शुभमुहूर्तावर सात्त्विक संकल्प केले जातात. त्या अनुषन्गाने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात ….. !
सस्नेह नमस्कार,
अक्षयतृतीया – अक्षय समृद्धीचं पूजन, शुभ संचिताच स्मरण, या शुभमुहूर्तावर सात्त्विक संकल्प केले जातात.
आमच्या परमश्रद्धेय आईवडिलांच्या, म्हणजे भवरलालजी व कांताईंच्या पावलांवर पाऊल ठेऊन आम्ही एक पवित्र कार्य हाती घेतलं आहे.
निसर्ग व शेतमाउलीने मुक्तहस्ताने दिलेले ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ गरजूना उपलब्ध करून देण्याच्या आमच्या “स्नेहाची शिदोरी” या कार्याच्या माध्यमातून, लॉकडाऊनच्या या बिकट काळात २,२५,००० हून अधिक लोकांना भोजन तयार करून ते पुरवण्याचं कार्य विविध सेवाभावी संस्था व स्वंयसेवक यांच्या सहकार्याने करता आल्याचं अंत:करणात समाधान आहे.
आजच्या शुभदिनी आम्ही सविनय सांगू इच्छितो की, हाती घेतलेलं हे पवित्र कार्य लॅाक डाउन काळात अविरत सुरू ठेवण्यासाठी वचनबध्द आहोत.
आई-वडिलांचे व जेष्ठाचे आशीर्वाद आहेतच, आपल्या सर्वांच्या सदभावना प्रार्थनीय आहेत.
आपला स्नेहांकित
अशोक जैन
– भवरलाल ॲंड कांताई जैन फॅमिली.
– गांधी रीसर्च फाऊंडेशन.
– जैन इरीगेशन, जळगांव