तीनवेळा पत्रव्यवहार करूनही वैद्यकीय महाविद्यालयाकडून दखल नाही

जळगाव ;– येथील जिल्हा करागृहात बंदी असलेल्या कैद्यांना कोवीशील्ड लस देण्यात यावी यासाठी कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर यांनी तीन वेळा पत्र व्यवहार केला असून यात कैद्यांचे लसीकरण वैद्यकीय महाविद्यालयाकडून होणे अपेक्षित असताना याची साधी दखलही घेण्यात आली नसल्याची माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली आहे.
जळगावच्या कारागृहाची क्षमता हि जवळपास २०० असून यात ३७६ हून अधिक कैदीअसल्याने फिजिकल डिस्टंसिंग होत नाही . त्यातच अनेकांचे वय ४५ पेक्षा जास्त असून आता १८ वर्षांवरील सर्वाना लस दिली जाणार असल्याने कैद्यांना देखील ती मिळावी अशी अपेक्षा आहे. तशा आशयाचे पत्र कारागृहाचे अधीक्षक अनिल वांढेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि शल्यचिकित्सकांना पाठविले आहे . कैद्यांचे लसीकरण करण्यात यावे यासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील पथकाला पाठवून त्वरीत कैद्यांना लसीकरण करण्यात यावे असे पत्र कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर यांनी दिले आहे.







