जळगाव (प्रतिनिधी) :- परिचारिका म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा असतो. दिवस रात्र रुग्णांची सेवा त्या करतात. कोरोना सारख्या महाभयंकर आपत्ती मध्ये देखील रुग्णांना बरे करण्यात, त्यांचे मनोबल वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या सेवेची दाखल घेऊन गोदावरी फाऊंडेशन, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल आणि शोभा सुपरमल्टी हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परिचारिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हेल्थ प्लस इन्स्टिटयूट च्या भारती रवींद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता केमिस्ट भवन, गणेश नगर, जळगाव येथे परिचारिका सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर वर्षा उल्हासपाटील, माजी महापौर विष्णू भाऊ भंगाळे, शोभा सुपर मल्टी स्पेशालिटी डॉ मेघा योगेश चौधरी विश्वप्रभा हॉस्पिटल च्या संचालिका डॉ सीमा राजेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या सोहळ्यामध्ये विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत 40 परिचरिकांचा सन्मान केला जाईल. तरी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले. या पत्रकार परिषदे प्रसंगी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डेप्युटी नर्सिंग सुप्रिटेंडन्ट मनीषा खरात, स्वप्न साकार फाउंडेशन चे उपाध्यक्ष अविनाश काळे, स्वप्न साकार फाउंडेशन चे सचिव उज्वला टोकेकर आदी उपस्थित होते.