वाढदिवसानिमित्त ब्रँडेड कंपनीचे मास्क वाटप

पारोळा (प्रतिनिधी) – येथील सामाजिक कार्यकर्ते व सरकारी कर्मचारी जगदीश पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महसूल विभागात ब्रँडेड कंपनीचे मास्क वाटप केले.

पारोळा महसुल विभागातील सतत समाजकार्यांत स्वतःहून अग्रेसर असणारे जगदीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कोरोना आजाराबाबत जनजागृती व्हावी व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आजारापासून दूर ठेवण्याच्या हेतूने स्वतःच्या वाढदिवसावर कुठल्याही प्रकारे केक अथवा खानपानवर निष्कारण खर्च न करता त्यांनी स्वखर्चाने आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एन 95 व स्वास या ब्रँडेड कंपनीचे मास्क सर्वांना दिले.
जगदीश पाटील यांनी कोरोनासारख्या महामारीत या अगोदर अमळनेर येथील गरजू लोकांना अन्नधान्याची व्यवस्था तसेच किराणा साहित्य सतत २५ मार्च पासून सलग तीन महिने निस्वार्थी मनाने स्वखर्चाने वाटप केले आहेत. पारोळा महसूल विभागात ते मनमिळावू स्वभावाचे ओळखले जातात. त्यांच्या या निस्वार्थी आणि सामाजिक उपक्रमांमुळे सर्वत्र कौतूक केले जात आहे.







