पोलीस दलातर्फे ऑपरेशन शोध मोहिम अंतर्गत उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे व पोलीस उपविभागाचे विशेष पथकांनी ऑपरेशन शोध मोहिम अंतर्गत दि. १७ ते दि.२४ एप्रिल या कालावधीत जळगाव जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनला दाखल मिसींग प्रकरणांपैकी ३८ महिला व १५ पुरुष असे एकुण ५३ व्यक्तीचा यशस्वीरित्या शोध घेऊन त्यांना त्यांचे परिवाराकडे सुपुर्द करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई यांचे कडील निर्देशान्वये दि. १७ एप्रिल ते दि.१५ एप्रिल या कालावधीत हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याकरीता ऑपरेशन शोध ही विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगांव जिल्हयात मिसींग असलेल्या व्यक्तींचा शोध घेणेबाबत जळगाव जिल्हा घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना विशेष पथक नेमुन मिसींग व्यक्तींचा शोध घेणेबाबत ऑपरेशन शोध हि विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिले होते. ऑपरेशन शोध मोहिम यापुढेही जळगांव जिल्हयामध्ये प्रभाविपणे राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त मिसींग व्यक्तींचा शोध घेणेकामी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत.